क्रिडा धर्म महाराष्ट्र राजकारण राज्य व्यवसाय

साहित्य संमेलन व व्यवसाय मार्गदर्शन लोकराज्य विशेषांक प्रकाशित

मुंबई, 3 :  साहित्य संमेलन, मराठी भाषा आणि व्यवसाय मार्गदर्शन यावर आधारित लोकराज्य फेब्रुवारीचा विशेषांक मराठी भाषा, शालेय, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आज येथे प्रकाशित झाला.

मंत्रालयात पार पडलेल्या या कार्यक्रमास माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती/प्रशासन) अजय अंबेकर, संचालक (माध्यम समन्वयक) शिवाजी मानकर उपस्थित होते.

बडोदा येथे होत असलेल्या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘साहित्य संमेलनाचे महत्त्व’यावर लिहिलेला लेख या अंकाचे वैशिष्ट्य आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या चरित्र साधनांची ओळख, मराठी भाषा विभागाचे उपक्रम, अक्षर साधना  कशी करावी या विषयांवरील लेखांचा अंकात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठी भाषा धोरण आखणीत भाषा सल्लागार समितीची भूमिका विशद करणारी डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखतही या अंकात आहे.

व्यवसाय मार्गदर्शन

या अंकात पुढील विषयांचा समावेश आहे : यशोशिखरावर कसे जाल ? (अविनाश धर्माधिकारी), समाज माध्यमांची शक्ती (प्रा. रवींद्र चिचोलकर), कलेचा आनंद आणि आनंदाची कला (प्रा. गजानन शेपाळ), डॉ. आंबेडकर थॉट: नवी संधी (डॉ. प्रदीप आगलावे), पुरातत्त्व शास्त्र – शोध मानव वंशाचा (हर्षदा विरकूड), स्वप्नांना शिष्यवृत्तीचे बळ (वर्षा फडके, विष्णू काकडे, शैलजा वाघ-दांदळे), यशदामध्ये नागरी सेवा परीक्षेची तयारी (डॉ. बबन जोगदंड), प्रशासकीय सेवेचा राजमार्ग (डॉ. म.बा. भिडे),कौशल्यातून उन्नतीकडे, दर्जेदार संस्था-सर्वोत्कृष्ट शिक्षण, कार्पोरेट प्रशासनाचे सूत्रधार. मराठी  भाषा आणि करीअर संधी.

60 पृष्ठांच्या या अंकाची किंमत 10 रु. आहे.

Follow Us On Social Media

Like Us On Facebook

Follow Us On Twitter

Popular News

Translate »