आंतरराष्ट्रीय महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय

“सत्याग्रह से स्वच्छाग्रह” मल्टिमिडिया चित्र प्रदर्शनाचे राजा रविवर्मा कलादालनात आयोजन

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या रिजनल आऊटरीच ब्युरो,पुणे कार्यालयाच्या वतीने घोले रोड येथील राजा रविवर्मा कलादालन येथे दि. 5 ते 8मार्च पर्यंत आयोजित “सत्याग्रह से स्वच्छाग्रह” या मल्टिमिडिया चित्र प्रदर्शनाला खासदार अनिल शिरोळे यांनी आज भेट दिली.यावेळी पुणे महानगरपालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, माहिती आणि प्रसारणमंत्रालयाच्या रिजनल आऊटरीच ब्युरोचे संचालक संतोष अजमेरा, आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री. शिरोळे यांनी चित्र प्रदर्शनाची पाहणी केली. ते म्हणाले, महात्मागांधीजींचे कार्य, त्यांचा इतिहास सध्याच्या तरुण पिढीला समजण्यासाठी तसेच स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल. गांधीजींनी सुरु केलेला स्वच्छतेचा वसा पुढे नेण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

श्री. अजमेरा म्हणाले, महात्मा गांधीजींच्या 150 व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रिजनल आऊटरीच ब्युरो, पुणे कार्यालयाच्या वतीने गांधीजींचे कार्य व त्यांच्या विचारांचा प्रसार होण्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रम घेण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून हे चित्रप्रदर्शन भरविण्यात आले आहे. या मल्टिमिडिया चित्र प्रदर्शनामध्ये स्वच्छता विषयक माहिती देणारे डिजीटल फ्लिपबुक, माहितीपट, लघुपट, स्वच्छभारत अभियानाची माहिती देणारी ‘क्यु आर कोड वॉल’, लहान मुलांना स्वच्छतेचे महत्व शिकवणारे गंमतीदार खेळ ठेवण्यात आले आहेत. तसेच या खेळांतील विजेत्यांना महात्मा गांधीजींच्या प्रतिमेच्या विविध वस्तू भेट देण्यात येत आहेत. दि 5 मार्च रोजी सुरु झालेले हे चित्र प्रदर्शन दिनांक 8 मार्चपर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 यावेळेत सर्वांसाठी खुले राहणार असून याप्रदर्शनाला सर्वांनी भेट द्यावी, असे आवाहनही श्री. अजमेरा यांनी यावेळीकेले.

प्रदर्शनाला विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी भेट देवून माहिती घेतली. तसेच याठिकाणी आयोजित कलापथकाचा उपस्थितांनी आनंद घेतला.

About the author

Achuk Varta

Add Comment

Click here to post a comment

Follow Us On Social Media

Like Us On Facebook

Follow Us On Twitter

Popular News

Translate »