जरा हटके मनोरंजन

विरारचा स्वरांग छोटा जादूगर भारतात प्रसिद्ध

विरार,(आकाश पोकळे):जादूगार स्वरांग प्रितम रणदिवे याने विरार मधील याझू पार्क मध्ये  दिनांक १५ एप्रिल रोज़ी सायंकाळी ६:३० ला जादूचे प्रयोग दाखवून लोकांना मंत्रमुग्ध केले याझू पार्क मध्ये आलेले सर्व पर्यटक खूप आश्चर्य चकित झाले की इतका लहान मुलगा तब्बल 45 मिनिटे लोकांना कर्मनुक केली. आलेल्या सर्व लहान मोठया ने स्वरांग सोबत सेल्फ़ी घेऊन त्याचे अभिनंदन केल.याझू पार्क च्या सर्व संचालक मंडळ तसेच कर्मचाऱ्यांनी त्याचे खूप कौतुक केले. स्वरांगचा थोडक्यात परिचय हा स्वरांग प्रितम रणदिवे केवळ सहा वर्षांचा आहे. हा विरार येथील जॉन 23 थर्ड   हायस्कूल अगाशी विरार पश्चिम येथे शिकत आहे त्यांनी साडे तीन वर्षां पासूनच जादुई दुनियातीन  प्रवास सुरू केला आहे.त्याचे वडिल जादूगार प्रितम विजय रणदिवे हे त्याचे गुरू आहेत. आणि भारतातील सर्वात छोटा जादूगार म्हणून स्वरांग प्रितम रणदिवे याची नोंद झाली आहे. आजपर्यंत जादूगार स्वरांग प्रितम रणदिवे याने 100 पेक्षा जास्त कार्यक्रम पूर्ण केले आहेत तसेच 35 पुरस्कार आणि  6 रेकॉर्ड ब्रेक केले आहेत . जितेंद्र कपूर (बॉलिवुड सुपरस्टार), अली खान (ऍक्टर), सुनील पाल (कॉमेडियन), अहेसांन कुरेशी (कॉमेडियन), बप्पी लेहरी (बॉलीवूड सिंगर)झाहिद चिस्ती (अजमेर ख्वाजा गरिब नवाजचे विश्वस्त), अरुण बक्षी (बॉलीवूड अभिनेता), यांन सारख्या अनेक महान व्यक्तीनं कडून याचा सत्कार करण्यात आला आहे.जुनियर पी. सी. सरकार यांनी त्याला ” ऍटम बॉम्ब ऑफ मॅजिक ” अशी उपमा दिली . कारण ते म्हणाले माझ्या वयाच्या सातव्या वर्षा पासून मी जादू शिकायला सुरवात केली आणि हा तर साडे तीन वर्षां पासून प्रोफेशनल कार्यक्रम दाखवतो ही खरच परमेश्वराची त्याच्यावर कृपा आहे .ब्राईट आऊटडोअर मीडिया, फॉर्च्यून लाइफलाइन, राईट मिरर (युट्युब चॅनल)मल्टिप्लेक्स चॅनल, बॉलीवुड अड्डा , बॉलीवूड की बाते, बॉलीवुड फॉक्स, कॉल बॉलीवुड, बीएनबी न्यूज, महानगर न्यूज, 24 तेहल्का न्यूज, मल्टिफ्रेम चॅनेल हैदराबाद , साक्षी वृत्तपत्र हैदराबाद ,विशेष दृष्टी वृत्त पत्र (दिल्ली) या सर्वांच्या आशीर्वादाने स्वरांगची जादूची कला सगळ्या पर्यंत पोहोचू शकली आणि तो एक भारतातील सर्वात छोटा जादूगार म्हणून प्रसिद्ध झाला त्यात या सर्वांचे विशेष योगदान  आहे . स्वरांग ची विशेष कामगिरी थोडक्यात अशी देता येईल : प्रेम चोपडा यांना  फिल्म इंडस्ट्री मध्ये 60 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक कार्यक्रम केला गेला त्या कार्यक्रमाचे नाव  “प्रेम नाम है मेरा”,असे होते त्या कार्यक्रमात स्वरांगनी आपला जादूचा कार्यक्रम सादर केला त्याला प्रेम चोपडा यांनी रंगमंचावर बोलावून त्याचे खूप कौतुक केले आणि ते असे म्हणाले मी या वयात काय करत होतो हे मलाही माहीत नाही या वयात हा मुलगा इथे माझ्या कार्यक्रमात त्याची जादूची कला दाखवून लोकांना मंत्रमुग्ध करून टाकतोय ही खरच खूप मोठी गोष्ट आहे . दरवर्षी प्रमाणे इंडिवूड फिल्म कार्निवल हैदराबाद रामजी फिल्म सिटी येथे होत त्यात “टॅलेंट हंट ” ही स्पर्धा असते त्यात पूर्ण भारतातून 600 स्पर्धकां मधून 200 ना निवडले आणि 200 मधून केवळ 2 बक्षिसे काढण्यात आली त्यात स्वरांग दुसऱ्या क्रमांकावर आला आणि म्हणून त्याला द ग्रेट खली (इंडियन रेसलर) आणि  सोहन रॉय (इंडिवूड फिल्म कार्निवलचे संस्थापक), यांच्या समोर कार्यक्रम करण्याची एक सुवर्ण संधी मिळाली आणि स्वरांग चा जादूचा कार्यक्रम बघून खाली नि त्याला आपल्या कडेवर उचलून घेतल. मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल मद्धे 2018, वरळी सीफेस, माइंड स्पेस मालाड आणि पवई. यथे सुद्धा त्याचे जादूचे प्रयोग झाले  नॅशनल लेव्हल मॅजिक कन्वेंशन 2016 मध्ये त्याला पहिला पुरस्कार मिळाला, आंतरराष्ट्रीय मॅजिक कन्व्हेन्शन 2016 ला हैदराबाद मध्ये जी जादूची स्पर्धा झाली त्यात सुद्धा स्वरांग ने प्रथम पारितोषिक मिळवले तेव्हा तेलंगणाचे गृह मंत्री नरसिंह रेड्डी आणि जादूगार शामला वेनू प्रसिद्ध जादूगार यांनी त्याचे खूप स्वागतकेले . 24 फेब्रुवारी 2018 रोजी आग्रा येथे आयोजित ताज मॅजिक फेस्टिवलमध्ये सुद्धा स्वरांगनी प्रथम पुरस्कार जिंकला आणि प्रथम आल्यामुळे त्याला तेथे गाला परफ़ोर्मणस करायला संधी मिळाली तसेच ताज मॅजिक सोसाइटीने आयोजित केलेल्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स राउंडमध्ये सुद्धा स्वरांग सर्वात छोटा जादूगार म्हणून प्रसिद्ध झाला.   महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2017 श्री बप्पी लेहरी (बॉलीवूड गायक व संगीतकार) यांच्या हस्ते दिला गेला. आर के एक्सलेन्स राष्ट्रीय पुरस्कार 2017 बॉलीवूड सुपरस्टार जितेंद्र कपूर आणि झाहिद चिस्ती (अजमेर चे ख्वाजा गरीब नावाजांचे विश्वस्त) यांच्या हस्ते दिला गेला.बॉलीवूड इंडियन स्टार अचिव्हमेंट अवॉर्ड 2017, मुंबई द्वारे सत्कार शूर वीर पुरस्कार 2017,मुंबई अनिल मुरारका (केएमडी ऑफ अॅम्पल मिशन आणि के.सी. कॉलेजाचे विश्वस्त) यांच्या हस्ते सत्कार आशा प्रकारे अनेक पुरस्कारांनी त्याला गौरवण्यात आले आहे . आणि त्याच्या पुढील जादूच्या वाटचाली साठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद  द्यावेत

Follow Us On Social Media

Like Us On Facebook

Follow Us On Twitter

Popular News

Translate »