धर्म महाराष्ट्र राज्य

मौले भावकी कुलस्वामिनी देवीचा गोंधळ उत्साहात साजरा.

महाराष्ट्रात कुलस्वामिनीच्या नावाने शुभ कार्यात गोंधळ, जागरण, घालण्याची पूर्वापार परंपरा आहे. या निमित्ताने कुलस्वामिनीची आराधना केली जाते.महाड तालुक्यातील खैरे तर्फे तुडील या गावी४ फेब्रुवारी २०१८ रोजी  मौले भावकी कुलस्वामिनी देवीचा त्रीवार्षिक  गोंधळ उत्साहात साजरा करण्यात आला.  गोंधळाची  सुरवात  कुलस्वामिनी दैवताची पूजा व होम करून करण्यात आली. हवन कन्या पूजनकरून देवीला प्रसन्न  केले जाते.  हा लोकविधी सादर करताना निरनिराळ्या देवतांना गोंधळी गोंधळाला येण्याचे गाण्यातूनच आवाहन  करत होते. उदा. अंबे जोगवा दे जोगवा दे मायमाझ्या भवानी जोगवा दे । हे जसे भक्तीची भक्ती करणारे गीत आहे तसे- रत्नागिरी ज्योतिबा । गोंधळा या हो । तुळजापूरची अंबाबाई गोंधळा या हो। पंढरपूरचे विठोबा गोंधळा या हो , असे गीतगाऊन आमंत्रित  करण्यात येत होते. त्यात वेगवेगळ्या कथा सांगितल्या.  द्वैत सारूनि माळ मी घालिन। हाती बोधाचा झेंडा मी घेईन। भेदरहित वारीस जाईन। असा जोगवा मागितला. जोंधळ्याच्या ताटाचे तिकाटणे उभे  करून , दिवटे पेटवत, दिवटी हातात घेऊन संबळाच्या तालावर गीत आणि नृत्य सादर  करण्यात आले . सर्व भाविकांनी आपापल्या परीने देवाला साकडे घातलेआणि  हे ऐकताना विशेष आनंद होत होता. या कार्यक्रमामध्ये सर्वाना अन्न दान करण्यात आलेआसा हा मौले भावकीचा कुलस्वामिनीचा गोंधळाचा सोहळा अगदी आनंदी व भक्तीमय वातावरणामध्ये पार पाडण्यात आला. कुलस्वामिनीच्या गोंधळाला मौले भावकी  बहुसंख्येने हजर होती त्यामुळे गोंधळाच्या सोहळ्याला सुंदरसे रूप आले होते. असा हा गोंधळ महाराष्ट्रात विशेष लोकप्रिय आहे. आजही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात गोंधळ परंपरा पाहावयास मिळते.  तसेच कुलस्वामिनी देवीचा नवरात्रीचे नऊ दिसव देवीचे विभिन्नरूपाची पूजा करण्याची प्रथा आहे. नवरात्रीचे नऊ दिवस सकाळ आणि संध्याकाळ देवीचे पूजन आणि आरती केली जाते.  पूर्ण नऊ दिवस उपास करून हवन व कन्या पूजनकरून देवीला प्रसन्न केलेजाते.

Follow Us On Social Media

Like Us On Facebook

Follow Us On Twitter

Popular News

Translate »