आंतरराष्ट्रीय क्रिडा जरा हटके मनोरंजन महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय

मुंबई ही चित्रपट निर्मितीची राजधानी – राज्यपाल चे. विद्यासागर राव

मुंबई, दि. ३  : मुंबई ही भारताची केवळ आर्थिकच नव्हे तर चित्रपट निर्मितीचीही राजधानी आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामुळे लघु चित्रपट निर्मात्यांना एक व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याचे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले.

१५ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप समारंभ आज येथील एनसीपीए येथे पार पडला. त्याप्रसंगी राज्यपाल बोलत होते. कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, चित्रपट महोत्सवाचे आयोजक तसेच फिल्मस् डिव्हीजनचे संचालक मनीष देसाई, चित्रपट निर्माते किरण शांताराम, चित्रपट – लघुपट निर्माते श्याम बेनेगल आदी उपस्थित होते. यावेळी श्याम बेनेगल यांना यावर्षीचा ‘व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

राज्यपाल म्हणाले, पुरस्कार विजेते श्याम बेनेगल हे केवळ चित्रपट निर्मातेच नव्हे तर सामाजिक भान असलेले उत्कृष्ट लघु चित्रपट निर्माते आहेत. भारतामध्ये दरवर्षी १६०० फिचर फिल्म्सची निर्मिती होते. यामध्ये हिंदी, तमिळ, तेलगू, बंगाली, मराठी अशा सर्व प्रादेशिक भाषेचा यात समावेश आहे. भारतीय चित्रपट जगभरात पाहिले जातात. लघुचित्रपटातून सामाजिक प्रतिमेचे दर्शन होत असते.

यावेळी नालंदा डान्स अॅकॅडमीच्या नृत्यांगणांनी केलेल्या ‘पृथ्वी आनंदिनी’ या नृत्य अविष्काराने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

Follow Us On Social Media

Like Us On Facebook

Follow Us On Twitter

Popular News

Translate »