आंतरराष्ट्रीय जरा हटके महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय

भारतीय उपखंडातील दुर्मिळ पक्ष्यांचे छायाचित्रण मंजुला माथुर यांचेकडून ‘बर्ड्स अबोड’ राज्यपालांना भेट

मुंबई, दि. 29 : निसर्गप्रेमी वन्यजीव छायाचित्रकार आणि भारतीय संरक्षण लेखा सेवेतील निवृत्त अधिकारी मंजुला माथुर यांनी आज (दि. २९) राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांना आपले ‘बर्ड्स अबोड’ हे कॉफी टेबल पुस्तक भेट दिले.

यावेळी मंजुला माथुर यांचे पती आणि राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर हे देखील उपस्थित होते.

‘बर्ड्स अबोड’ हे पुस्तक भारतीय उपखंडातील पक्ष्यांच्या विविध प्रजातींच्या मंजुला माथुर यांनी काढलेल्या छायाचित्रांचे संकलन आहे.

आपल्या सेवाकाळात पक्षांचा अधिवास असलेल्या देशातील विविध ठिकाणांना भेट देऊन मंजुला माथुर यांनी माळरानातील पक्षी, वाळवंटातील पक्षी, जंगलातील पक्षी, शिकारी पक्षी, जलपक्षी, आर्द्रभूमीतील पक्षी यांसह अनेक पक्षांचे छायाचित्रण केले आहे.

About the author

Achuk Varta

Add Comment

Click here to post a comment

Follow Us On Social Media

Like Us On Facebook

Follow Us On Twitter

Popular News

Translate »