आंतरराष्ट्रीय धर्म मनोरंजन महाराष्ट्र राजकारण राज्य राष्ट्रीय

प्रभु श्रीराम यांच्या समतायुक्त समाजाच्या निमिर्तीच्याच मार्गाने जनतेची सेवा करु – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि.25: श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेला 51 वर्षाची गौरवशाली परंपरा आहे. या ऐतिहासिक श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेत सर्व जातीचे लोक सहभागी होतात. मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम यांनी ज्याप्रमाणे समतायुक्त समाजाची निर्मिती केली. त्याच मार्गाने राज्यातील लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करु, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

श्री.पोद्दारेश्वर राम मंदीर येथून श्रीराम जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी मोठया प्रमाणात शोभायात्रा काढण्यात येते. या शोभायात्रेत लाखो भाविक सहभागी होतात. शोभायात्रेनिमित्त फुलांनी सजवलेल्या रथामध्ये प्रभु श्रीरामचंद्र, माता जानकी, श्री. लक्ष्मण, श्री. हनुमान यांच्या मुर्तीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुजन करुन माल्यार्पण केले. त्यानंतर विधिवत शोभायात्रेला सुरुवात झाली. यावेळी श्रीराम जन्मोत्सवानिमित्त जनतेला शुभेच्छा देतांना मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय  परिवहन मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही जनतेला शुभेच्छा दिल्या.

पश्चिम नागपूर नागरिक संघाचा श्रीराम जन्मोत्सव

पश्चिम नागपूर नागरिक संघ, श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीतर्फे श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. श्रीराम पालखीचे पूजन तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदाताई जिचकार, आमदार सुधाकरराव देशमुख, आमदार डॉ. परिणय फुके, महानगर पालिका सत्तापक्ष नेते संदिप जोशी यांच्याहस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांनी श्रीरामाचे दर्शन घेऊन रामनवमी निमित्त शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, श्रीराम हे भारतीयांचे आराध्य दैवत असून ते मर्यादाशिलतेचे प्रतीक मानले जातात. श्रीरामांच्या आदर्शानुसार विषमतामुक्त राज्य घडवू या. असे आवाहनही श्री. फडणवीस यांनी केले.

 

Follow Us On Social Media

Like Us On Facebook

Follow Us On Twitter

Popular News

Translate »