महाराष्ट्र राज्य व्यवसाय

नोंदीत बांधकाम कामगारांना अर्थसहाय देण्यास मान्यता

मुंबई दि. 14 : अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत (ग्रामीण) नोंदीत बांधकाम कामगारांना अर्थसहाय देण्यास मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत बांधकाम कामगारांपैकी ग्रामीण भागातील नोंदीत बांधकाम कामगारांच्या आवास योजनेस मंजुरी आणि अर्थसहाय देण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही मान्यता ग्राम विकास विभागाअंतर्गत येणाऱ्य राज्य व्यवस्थापन कक्ष संचालक यांच्यामार्फत देण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील नोंदीत बांधकाम कामगारांसाठी मंजूर अटल बांधकाम कामगार आवास योजनेनुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडील नोंदीत बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वत:च्या/पती/पत्नीच्या नावावरील जागेवर नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रुपांतर करण्यासाठी दीड लाख रुपयाचे अनुदान मंडळाकडून उपलब्ध करुन देण्यात येईल. पात्र ठरलेल्या बांधकाम कामगारांनी किमान 269 चौ.फूट इतके चटई क्षेत्र असलेले घर बांधकाम करणे आवश्यक आहे. त्यापेक्षा जास्त क्षेत्राचे बांधकाम स्वखर्चाने करण्यास मुभा राहील.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर MGMREGA अनुज्ञेय असणारे अठरा हजार रुपये तसेच स्वच्छ भारत अभियानादवारे शौचालय बांधण्यासाठी अनुज्ञेय असणारे बारा हजार रुपये असे एकूण तीस हजार रुपयाचे अनुदान दीड लाख रुपयामध्ये समाविष्ठ असल्याने संबंधित योजनांचा दुबार लाभ देय राहणार नाही.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत असलेल्या बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ घेता येईल. नोंदीत बांधकाम कामगारांचे स्वत:च्या/पती/पत्नीच्या नावावर महाराष्ट्र राज्यात पक्के घर नसावेतसे शपथपत्र देणे आवश्यक राहील. याबरोबरच नोदींत बांधकाम कामगारास पक्के घर बांधण्यासाठी स्वत:च्या/पती/पत्नीच्या नावे मालकीची जागा असावी अथवा मालकीचे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल. या योजनेचा लाभ प्रती कुटुंबासाठी असून बांधकाम कामगारांनी शासनाच्या इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत केलेल्या अर्जाची छाननी करण्यासाठी अपर कामगार आयुक्त/कामगार उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय लाभार्थी निवड समिती गठीत करण्यात आली आहे.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालकमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जिल्हा कार्यकारी अधिकारी या समितीमध्ये सदस्य असतील. तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे उप जिल्हा कार्यकारी अधिकारी या समितीत सदस्य सचिव असतील.

या शिवाय जिल्हास्तरीय सनिंयत्रण समितीदेखील गठीत करण्यात आली असून यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे अध्यक्ष असतील तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आणि जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता हे सदस्य असतील. तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे उप कार्यकारी अधिकारी हे सदस्य सचिव असतील.

About the author

Achuk Varta

Add Comment

Click here to post a comment

Follow Us On Social Media

Like Us On Facebook

Follow Us On Twitter

Popular News

Translate »