मनोरंजन व्यवसाय

नाटक :” आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल”.. एका वेगळ्या वाटेवरचा बंदिस्त प्रयोग

माणसाचे मन बेचैन झालं कि त्याला एकांत हवा असतो आणि हा एकांत त्याला त्याच्या जीवनात कधी कोणत्या प्रकारच्या माध्यमातून येईल हे त्याचे त्यालाच माहित नसतेआपल्या मनाची झालेली घुसमट अर्थात गळचेपी त्याला एकटेपणाकडे घेऊन जातेहा एकटेपणा सर्वसामान्य माणसाच्या जीवनात येतो त्यावेळी त्याच्या आजूबाजूची परिस्थिती कारणीभूत झालेली असतेमनाचा कोंडमारा झाला कि त्याला एकटेपणाची सवय होते किंवा ती त्याला करून घ्यावी लागतेमग वाटयाला आलेलं एकटेपण आणि त्याच्या मनाची झालेली दयनीय स्थिती त्यातून त्याच्या मनामध्ये चाललेल्या अस्वस्थतेला अर्थात घुसमटलेल्या परिस्थितीचा स्फोट होतो आणि त्याच्या मनाची भावना बोलू लागतेती भावना तो मिळालेल्या माध्यमातून व्यक्त करतो,,,, असाच काहीसा मध्यवर्ती धागा पकडून गजेंद्र अहिरे यांनी आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल ” ह्या नाटकाचे लेखन आणि दिगदर्शन केलं आहेगजेंद्र अहिरे यांचे लेखन हे वेगळ्याप्रकारचे असते आणि ते विचार करायला लावते हे सर्वाना माहित आहेचहे नाटक  एकदंत क्रिएशन्स निर्मित असून निर्माते चंद्रकांत लोहोकरेहर्षल बांदिवडेकरहे आहेतनेपथ्य आणि प्रकाश योजना प्रदीप मुळ्ये यांनी केली असून संगीत शैलेंद्र बर्वें यांचे आहेया मध्ये नेहा जोशी,नम्रता आवटेप्रणव जोशीकिरण राजपूतश्रद्धा मोहिते शशांक केतकर हे कलाकार आहेत प्रत्येकानी आपापली भूमिका प्रामाणिकपणे केली असून त्या व्यक्तिरेखेला न्याय दिलेला आहे.

राघव नावाचा कवी मनाचा चित्रकार एका मोठया जाहिरात कंपनीमध्ये त्यांनी सांगितलेल्या जाहिरातीसाठी चित्रे अनेक वर्षे रेखाटत असतोते काम त्याला पोटापाण्यासाठी करावे लागत असतेपण कालांतराने तेथे त्याच्या मनाची घुसमट व्हायला सुरवात होतेतेच तेच रुटीन काम करण्याचा त्याला कंटाळा येतोमन अस्वस्थ होते आणि ते एकटे पडायला सुरवात होतेमुळात हा चित्रकार मुंबई मधील एका चाळीत एकटाच रहात असतोपण त्याला सांभाळून घेणारी सई नावाची त्याची मैत्रीण त्याच्या सोबत राहत असतेअसे दोघेच त्या चाळीमधील एका खोलीत रहात असतातसई हि एका ऑफिसमध्ये अधिकारी पदावर काम करीत असतेराघव तिच्या सोबत रहात असला तरी त्यांचे लग्न झालेले नसतेत्यामुळे ती एकटीच असतेकधी कधी तिला सुद्धा एकटेपणाच्या भावना ग्रासत असतातसईच्या ऑफिस मध्ये वाघ नावाचे सहकारी काम करीत असतातवाघ यांचे लग्न झालेलं आहे घरी बायको आहेपण ती फक्त घरकामासाठी असावी असे त्यांचे मत असतेलग्न झालेल्या वाघांना काही कारणामुळे एकटेपणाच्या भावना सतावीत असतातवाघ यांची बायको जया हि एक चित्रकार आहेपण लग्न झाल्यानंतर घरात फक्त घरकाम करणे इतकेच ती करीत असल्याने तिचे चित्रकार असलेलं मन हे आता एकटे पडलेलं आहेत्यामुळे तिने तिच्या भावभावना दाबून टाकलेल्या असताततिच्या आयुष्यतील पूर्वीचा असलेला चित्रकलेचा कॅनव्हास आता रिकामा आहेएक दिवस तिची आणि चित्रकार राघव ह्यांची गाठभेट होते आणि एक वेगळेच नाटय निर्माण होतेचित्रकलेचा अभ्यास करणारी एक पत्रकार असलेली व्यक्ती सुद्धा एकटेपणाचे जीवन जगत असल्याने विविध प्रकारच्या चित्रामध्ये ती आपले मन गुंतविण्याचा प्रयत्न करीत वाटते तसेच चाळीमधल्या खोलीची मालकीण पांचाळ बाई ह्यांचा नवरा अनेक वर्षे जेल मध्ये असल्याने त्या एकाकीपणाचे जीवन जगत असतात.

अश्या ह्या एकाकीपणाचे जीवन जगणाऱ्या विविध स्तरांमधील व्यक्तिरेखा काहींना काही कारणामुळे एकत्र येतातहे नाटक एकटेपणाच्या भावनामनामधील घुसमटह्यावर भाष्य करतेचित्रकार राघव हा कवी मनाचा चित्रकार आहेतो त्याची चित्रे रेखाटत असताना अनेक रंगाचा वापर करीत असतोहे रंग एकत्र जरी दिसत असले तरी ते स्वतंत्र आहेतत्या प्रत्येक रंगाचे एक अस्तित्व आहेआणि ह्या नाटकातील व्यक्तिरेखांचे हि असेच झालेलं आहेसर्व एकत्र बांधलेली दिसली तरी प्रत्येकाचे व्यक्तिमत्व हे वेगवेगळे आहेस्वभावाचे वेगळेपण स्वतंत्रपणे नाटककाराने रेखाटले आहेप्रत्येकाची मनस्थिती विभिन्न आहेनाटकाचे नाव सुद्धा असेच आहेगजेंद्र अहिरे यांनी हे नाटक बंदिस्तपणे सादर केलं आहेह्यातील घटना ह्या पटकथेप्रमाणे नाटयपूर्ण रीतीने सादर केलेल्या असल्याने त्या मनाचा ठाव घेतात.

शशांक केतकर यांनी चित्रकार राघव ची भूमिका उत्तमपणे सादर केली असून त्याने त्याच्या मनाची घालमेल – अस्वस्थपणा छान व्यक्त केला आहेत्यांच्याबरोबर नेहा जोशी ची सईनम्रता आवटे यांची पांचाळ बाईकिरण राजपूत यांची जयाह्या सर्व व्यक्तिरेखा लक्षांत रहातातह्या सर्वांच्या सोबत वाघ च्या भूमिकेतील प्रणव जोशीजर्नालिस्ट श्रद्धा मोहिते यांची साथ उत्तम लाभलेली आहेनेपथ्य प्रकाश योजना प्रदीप मुळ्येतसेच शैलेंद्र बर्वे यांचे संगीत ह्या जमेच्या बाजू आहेतएक वेगळ्या वाटेवर घेऊन जाणारी हि नाटयकृती आहेहे असे वेगळ्या धाटणीचे नाटक निर्माते चंद्रकांत लोहोकरेहर्षल बांदिवडेकर यांनी सादर केलं आहे त्यांचे अभिनंदन करायलाच पाहिजेएकटेपणाचा ठाव घेणारा हा प्रयोग दिगदर्शकानी बंदिस्तपणे सादर केला आहेत्याचा आस्वाद – अनुभव एकदा जरूर घ्यायला पाहिजे……

दीनानाथ घारपुरे [ ९९३०११२९९७ 

Follow Us On Social Media

Like Us On Facebook

Follow Us On Twitter

Popular News

Translate »