मनोरंजन

चित्रपट “ डोक्याला शॉट ,, एक प्रामाणिक प्रयत्न

डोक्याला शॉट ह्या नावातच गंमत आहे, एखादी घटना घडते आणि त्या घटनेमुळे काही वेळा आपणाला त्रास होतो तर कधी गंमत सुद्धा येते, अश्या दोन्ही प्रकाराने आपल्या डोक्याला शॉट लागतो, हा लागलेला शॉट त्याचा धक्का हा गंभीर आणि धमाल मनोरंजन करणारा असतो. अश्याच मध्यवर्ती कल्पनेवर  डोक्याला शॉट  ची बांधणी केली आहे. ए विवा इनएन प्रोडक्शन या चित्रपट संस्थे तर्फे डोक्याला शॉट ची निर्मिती केली आहे. निर्माता उत्तुंग हितेंद्र ठाकूर हे आहेत. कार्यकारी निर्माते रोहन गोडांबे, विनीत जैन, हे असून दिग्दर्शन शिवकुमार पार्थसारथी यांचे लाभले आहे. पटकथा, संवाद वरुण नार्वेकर, शिवकुमार पार्थसारथी यांचे असून संगीत श्रीकांत, अनिता, अमितराज यांनी दिले आहे. या मध्ये सुव्रत जोशी , प्राजक्ता माळी, ओमकार गोवर्धन, रोहित हळदीकर गणेश पंडित ह्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

      डोक्याला शॉट हि कथा अभिजित आठल्ये, चंदू, भज्जी, गणेश पंडित या चार मित्रांची असून अभिजित आठल्ये हा सुब्बुलक्ष्मी अय्यंगार ह्या तामिळ मुलीच्या प्रेमात पडलेला असून त्याला तिच्या बरोबर लग्न करायचे असते पण तिचे वडील परवानगी देत नसतात शेवटी अनेक प्रयत्नानंतर ते दोघांच्या लग्नाला परवानगी देतात, पण हे लग्न तामिळ पद्धतीने होईल अशी अट घालतात, आणि लग्नाची तारीख ठरते.

      हे चार मित्र घरी येतात, त्याचवेळी बरेच दिवसात क्रिकेट खेळलो नाही म्हणून ते चौघे क्रिकेट च्या मैदानात जाऊन क्रिकेट खेळतात, खेळताना एकजण जोराचा  शॉट  मारतो आणि मारलेल्या चेंडू चा कॅच अभिजित आठल्ये पकडायला जातो त्यात तो अडखळतो आणि एका दगडावर त्याचे डोके जोराने आपटते, आणि तेथून नाट्यमय घटनांना सुरवात होते, डोक्यावर पडल्याने त्याच्या मेंदूला इजा होते, ह्या शॉट मुळे त्याला मागील घटनांचा विसर पडण्यास सुरवात होते त्याची मानसिक स्थिती बिघडते, त्याच्या समस्येवर त्याचे मित्र त्याला मदत करण्याचे ठरवतात, अभिजित चे लग्न दोन दिवसावर असल्याने त्याला बरे होणे गरजेचे असते, त्याला बरे करण्यासाठी त्याचे मित्र एकजुटीने खूप प्रयत्न करतात, ह्या गंभीर घटने मधून सावरण्यासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल करतात. शेवटी नेमके काय होते हे सिनेमात पहायला मिळेल.

      दिग्दर्शक शिवकुमार पार्थसारथी यांनी चित्रपटाची गती व्यवस्थित राखली आहे. विषयच गंभीर असल्याने तो हलकाफुलका कसा होईल ह्या कडे त्यांनी लक्ष दिले आहे. सुव्रत जोशी ओमकार गोवर्धन, रोहित हळदीकर, गणेश पंडित यांनी त्यांच्या भूमिकेला योग्य तो न्याय दिलेला आहे. प्राजक्ता माळी ने सुबुलक्ष्मी भूमिका छान रंगवली आहे. डोक्याला शॉट हा एक प्रसंगनिष्ठ विनोदाने भरलेला नाट्यमय गंभीर आणि विनोदी घटनाने साकारलेला सिनेमा आहे. मित्र हे फक्त हास्यविनोद करण्यासाठीच नसतात तर त्यांची मैत्री हि जीवाभावाची असते, मित्र हे संकट काळात मदत करायला तयार असतात, मैत्री हिची मोठी असते असा संदेश हा सिनेमा देऊन जातो.

      शेवटी अभिजित आठल्ये चे सुब्बलक्ष्मी बरोबर लग्न होते का ? कश्या पद्धतीने होते ? त्या काळात अभिजित आणि त्याचे मित्र कसे वागतात ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे सिनेमात मिळतील. खरी मैत्री, खरे प्रेम, आणि सकारात्मक भावना हे सारे विनोदाच्या माध्यमातून सादर केल आहे. एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

दीनानाथ घारपुरे…. ९९३०११२९९७

Follow Us On Social Media

Like Us On Facebook

Follow Us On Twitter

Popular News

Translate »