जरा हटके मनोरंजन महाराष्ट्र राज्य व्यवसाय

उत्तर अनुत्तरितच…. ‘तारेवरी डोलता नाचतो कोल्हाटी नाचतो डोंबारी रं नाचतो डोंबारी’

भटक्या जातीचं प्रतिनिधित्व करणारी ही लोककला कसरतींसह सादर होणा-या नृत्यासाठी ओळखली जाते.
मुळात ही भटकी जमात असल्यानं जिथं-जिथं जत्रा होतात, त्या गावात त्यांचा तात्पुरता मुक्काम असतो. त्यानंतर मैलोन्मैल पायी प्रवास करताना काही माणसांची टोळी आढळली, की आसपास पुन्हा तात्पुरता मुक्काम करत डोंबारी नाच करतात आणि त्यांचा पुढील प्रवास सुरू होतो.
नाच व खेळ यांचा सुरेख संगम साधत मनोरंजन या उद्दिष्टापासून थोडी फारकत घेत, केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी जन्माला आलेली कला म्हणजे ‘डोंबारी कला’.
फाटके कपडे, शिळे अन्न रस्त्यावरच कुठेतरी कोप-यात बसून खाणा-या या जमातीच्या कसरती चाळ्यांपेक्षा सिनेमागृह, मॉल अशी ठिकाणे आता मनोरंजनासाठी, विरंगुळ्यासाठी उपलब्ध असल्याने आता पोटाचा चिमटा मोठा झाल्याचं त्यांच्या परिस्थितीवरून जाणवंत. राहण्यासाठी ना पक्क घर, ना शिक्षण, अविकासाच्या दारिद्रयात लोटल्या गेलेल्या या जमातीपुढे आता कोणता पर्याय निवडावा, याचं उत्तर अनुत्तरितच आहे.
-वैशाली आहेर.

Follow Us On Social Media

Like Us On Facebook

Follow Us On Twitter

Popular News

Translate »