महाराष्ट्र व्यवसाय

आरसेटीच्या नुतन ईमारतीचे मुख्यमंत्री यांचे हस्ते लोकार्पण

भंडारा, दि. 4:- स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राच्या भव्य व आकर्षण इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.

          लाल बहादूर शास्त्री ज्युनियर कॉलेज पटांगणाजवळ 1 कोटी 24 लाख रुपये खर्च करुन  ही भव्य वास्तू उभारण्यात आली आहे. याठिकाणी तरुण-तरुणींना स्वयंरोजगाराचे निवासी प्रशिक्षण देण्याची सोय आहे. यापूर्वी हे प्रशिक्षण केंद्र माविम कार्यालय मोहाडी येथे स्थित होते. मागील तीन वर्षात आरसेटी मार्फत 3411 उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यापैकी 2209 उमेदवारांनी आपला रोजगार सुरु केला आहे. यापुढे नुतन इमारतीत प्रशिक्षण सोय असणार आहे.

          महिला बचतगटांनी बनविलेल्या उत्पादन यावेळी मुख्यमंत्री यांना भेट देण्यात आली. महिला बचतगटांच्या महिलांना मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रतिनिधीक सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशिक्षणार्थी तरुण-तरुणी व महिला बचतगटांच्या महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. परिणय फुके,  आमदार अँड रामचंद्र अवसरे, आमदार चरण वाघमारे,  जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, जिल्हा पोलिस अधीक्षक विनिता साहू,  उप विभागीय अधिकारी बी.पी.पृथ्वीराज, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, बँक ऑफ इंडियाचे महाप्रबंधक अजय शाहू, के.एन.जनार्दना, आंचलिक प्रबंधक जे.सी.शशीराज, झोनल मॅनेजर नागपूर ए.के.जमुआर, लिड बँक व्यवस्थापक आर.एस.खांडेकर, व्ही.एम.पोतदार, संचालक एन.वाय. सोनकुसरे, इरफान खान पठाण, आर.आर.बैस, जयप्रकाश शर्मा, सुधीर श्रीवास्तव, पी.एच.गुप्ता व अधिकारी उपस्थित होते.

Follow Us On Social Media

Like Us On Facebook

Follow Us On Twitter

Popular News

Translate »