महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय व्यवसाय

अग्रक्रम टिकवूनठेवत महाराष्ट्राने अधिक असंघटीत कामगारांची नोंदकरावी – केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल

मुंबई, दि. 5:केंद्र शासनाच्या अंतरिम अर्थसंकल्पात प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणली गेली. या योजनेची पुढील 15 दिवसात म्हणजेच 15 फेब्रुवारीपासून अंमलबजावणी करण्यात आली. आणि अवघ्या 18 दिवसात महाराष्ट्राने सव्वा दोन लाखांहून असंघटित कामगारांची नोंद प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत केली आहे.आता महाराष्ट्राने हा अग्रक्रम येणाऱ्या काळात टिकवून ठेवत अधिकाधिक असंघटित कामगारांची नोंद या योजनेखाली करावी, असे केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ संदेश कार्यक्रमादरम्यान दाखविण्यात आला. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या योजनेमुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय आणि सन्मान मिळणार असल्याचे अधोरेखित केले. येणाऱ्या काळात महाराष्ट्र अधिकाधिक असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेईल असे स्पष्ट केले.

देशभरातील 1 कोटीहून अधिक असंघटित कामगारांची नोंदणी येणाऱ्या काही दिवसातच पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करीत केंद्रीय रेल्वे मंत्री यावेळी म्हणाले, केंद्र शासनाने अशक्यला शक्य करुन दाखविताना दुर्लक्षित असलेल्या कामगारवर्गासाठी आणलेली प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना त्यांच्या कष्टाला एक संरक्षण आणि सन्मान मिळवून देण्याचे काम करणार आहे. अनेकदा अनेक योजना अर्थसंकल्पात मांडल्या जातात पण त्या कधीच प्रत्यक्षात आणल्या जात नाही. मात्र केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पात 1 फेब्रुवारी रोजी मांडल्या गेलेली योजना आता देशभरात अंमलात आणली जात आहे याचा अत्यंत आनंद आहे.अधिकाधिक असंघटित कामगारांची नोंदणी करण्यात महाराष्ट्राने येणाऱ्या काळातही आपला अग्रक्रम टिकवून ठेवावा.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कळ दाबून या योजनेचा शुभारंभ केला. तसेच यावेळी जाहीर कार्यक्रमात उपस्थित जनतेला उद्देशून भाषण करताना त्यांनी या योजनेमुळे कामगारांच्या कामाला न्याय, प्रतिष्ठा आणि सन्मान देण्याचे काम केंद्र शासनाच्या कामगार विभागामार्फत करण्यात आले असल्याचे सांगितले.प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना आधार म्हणून असणार असून या योजनेत अधिकाधिक असंघटित कामगारांची नोंदणी व्हावी यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

असंघटित कामगारांना प्रतिष्ठा आणि सन्मान देणारी योजना संभाजी पाटीलनिलंगेकर

कामगार मंत्री श्री. पाटील -निलंगेकर यावेळी म्हणाले, बांधकाम कामगार  आणि विविध 127 व्यवसाय गटातील पात्र असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षितता मिळणार आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही असंघटित कामगारांना प्रतिष्ठा आणि सन्मान देणारी योजना आहे. असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना या योजनेमुळे निवृत्तीवेतनाची हमी मिळाली आहे. देशातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी केंद्र शासनाने या योजनेमार्फत सरकार आर्थिक सुरक्षा दिली आहे.या योजनेमुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांना निवृत्तीनंतर किमान निवृत्तीवेतनाची हमी मिळणार आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे केंद्रीय रेल्वे आणि कोळसा मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी कामगार मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर, खासदार डॉ. विकास महात्मे, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव असिम कुमार गुप्ता, कामगार आयुक्त पंकज कुमार, कामगार आयुक्त राजीव जाधव यांच्यासह केंद्र व राज्य शासनाच्या कामगार विभागाचे अधिकारी, जीवनविमा महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत सहभागी झालेल्या निवडक असंघटित क्षेत्रातील कामगारांना यावेळी या योजनेचे कार्ड देण्यात आले.

About the author

Achuk Varta

Add Comment

Click here to post a comment

Follow Us On Social Media

Like Us On Facebook

Follow Us On Twitter

Popular News

Translate »